मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथे शाळेतून घरी जात असलेल्या एका 15 वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरीने उचलून नेवून ऊसाच्या फडात जबरी अत्याचार केल्याप्रकरणी रामण्णा शिवशंकर केदार याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना दि.19 रोजी सायंकाळी 5.15 वा. डोणज शिवारात घडली आहे.दरम्यान,घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.




या घटनेबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील पिडीत मुलगी शाळा सुटल्यानंतर दि. 19 रोजी सायंकाळी 5.00 वा. घराकडे जात असताना आरोपी रामण्णा केदार याने पाठीमागच्या बाजूने जावून टॉवेल टाकून तिला जबरदस्तीने उचलून नेवून चिदानंद स्वामी यांच्या शेतातील ऊसामध्ये ओढत नेवून ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनसुध्दा तीला मारहाण करून तीच्यावर जबरी अत्याचार केल्याचे पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत  म्हटले आहे.

घटनेनंतर पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. घटनेनंतर आरोपी रामण्णा केदार हा फरार झाला असून उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या शोधासाठी जिल्हयात व जिल्हयाच्या बाहेर दोन पथके तात्काळ रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा