न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल, ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल, ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

 


टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथील आरोपी नाना ज्ञानेश्वर जगताप याची जातीवाचक शिवागळ व मारहाण केल्याप्रकरणी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.सुरवसे सो यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी नाना ज्ञानेश्वर जगताप याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भा. न्या.स . २०२३ चे कलम



११८(१),११५(२),३५२,३५१(१),३५१(३),३(५) व अनुसूचित जाती व अुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va) प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.



सदर आरोपी याने ॲड.ओंकार भुसे यांचेमार्फत पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.सुरवसे सो यांचे कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.


सदर प्रकरणातील आरोपी यांचेविरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसल्याने व आरोपीचे कोणतेही जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याचा उद्देश नसल्याने



सदर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करावा असा युक्तीवाद ग्राह्य धरून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री.सुरवसे सो यांनी जामीनावर मुक्तता केली आहे.

सदर प्रकरणी यातील आरोपीतर्फे ॲड.ओंकार रामेश्वर भुसे (77690 28644) व ॲड.नितीन शिराम यांनी काम पाहिले व सरकार तर्फे ॲड.गोरे यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

"मंगळवेढा टाईम्स"च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा