मंगळवेढ्यातील तरूणीचा घरात घुसून विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १६ जुलै, २०१९

मंगळवेढ्यातील तरूणीचा घरात घुसून विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरात राहणाऱ्या एका तरूणीचा घरात घूसून विनयभंग केल्याप्रकरणी बाळासाहेब उर्फ समाधान सुर्यकांत पवार(शनिवार पेठ,मंगळवेढा) व अनोळखी इसमा विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 




याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी व फिर्यादीची बहिण सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास घरातील हॉलमध्ये टि.व्ही.बघत बसली होती.घराचा दरवाजा पुढे ढकललेला होता. दरवाजाची आतून कडी लावली नव्हती. 

दरम्यान घराचा दरवाजा उघडल्याचा जोरात आवाज आल्याने पिडीत मुलगी पाहण्यासाठी गेली असता तुझी बहिण कोठे आहे असे जोरात बोलण्याचा आवाज आल्याने फिर्यादी तिकडे गेले. त्यावेळी दोन्ही इसमाने पिडीतेचा हात धरून जोरात ओढत असल्याचे निदर्शनास आले. त्यातील एका इसमाने फिर्यादीचा हात धरून ओढले. 

त्यावेळी फिर्यादी ओरडला.आवाज ऐकून फिर्यादीची आई व भाऊ तसेच शेजारी राहणारे पळत आले.सर्वजण आल्याचे पाहून आरोपी पळून गेले.आरोपीने पिडीत मुलीचा हात धरून तीला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा