मंगळवेढा राष्ट्रवादीकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

मंगळवेढा राष्ट्रवादीकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी



टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारताच्या इतिहासावर अमिट छाप निर्माण करणाऱ्या व महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून कर्तृत्वाची भरारी घेण्यास पंख देणाऱ्या 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा राष्ट्रवादीच्या वतीने शिक्षिकेचा गौरव करण्यात आला.


महिला उद्योजिका इमारत येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 


सावित्रीबाई फुले यांच्या कर्तुत्ववान कार्यामुळेच आजपर्यंत देशात पंतप्रधान, राज्यपाल, विविध खेळाडू, डॉक्टर अशा विविध पदांवर महिलांनी जबाबदारी पार पाडली आहे.

आयोजिका राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष स्मिताताई अवघडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे, सत्कारमूर्ती सौ सुप्रिया जगताप, सोलापूर जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी सावंजी, खजिनदार माधुरी हजारे,शहर कार्याध्यक्ष सुनिता गाडे, शहर सचिव वर्षा सुतार, तसेच शहर उपाध्यक्ष पदी प्रियांका कुराडे यांची नियुक्ती करण्यात आली. 


शिक्षक संतोष दुधाळ,नितीन मोरे, शिवकुमार स्वामी व बचत गटाच्या अध्यक्षा संगीता रजपूत, आशा पाटील सुनिता चव्हाण. 


अंगणवाडीसेविका राजश्री भंडारे व प्रायमाच्या शिक्षिका नीता डोके, अश्विनी ढाकणे,  स्वाती माळी, लता कुलकर्णी, सुनिता कुंभार, वैशाली खांडेकर, सविता रत्नपारखी, गीता घुंगे आदीजन उपस्थित होते.


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा