कौतुकास्पद! सर्जेराव सावंत यांना जीवन वैभव पुरस्काराने सन्मानित - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

कौतुकास्पद! सर्जेराव सावंत यांना जीवन वैभव पुरस्काराने सन्मानित

 


टीम मंगळवेढा टाईम्स ।

दैनिक अंबरनाथ जनमत या वर्तमानपत्राच्या 13 व्यां वर्धापन दिनाचेऔचित्य साधू सर्जेराव सावंत यांना मिलिंद लिमये, विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबई यांच्या हस्ते व दैनिक अंबरनाथ जनमतचे संपादक पांडुरंग रानडे यांच्या उपस्थितीत 


जीवन वैभव 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री सर्जेराव सावंत हे शैक्षणिक जीवनानंतर आयुर्विमा क्षेत्रापासून आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात करून 



आयुर्विमा क्षेत्रात आपल्या परिश्रमाने आणि संभाषण कौशल्याने स्वतःचा ठसा त्यांनी निर्माण केला. 


आपली व्यवसायिकता जपतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेचे आपले वृत्त सांभाळण्यासाठी रोटरी सारख्या जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेत योगदान देऊन समाजसेवेत अखंडितपणे ते कार्यरत राहिलेत. 


रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टचे सदस्य ते अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. रोटरीतील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलीत. 


आयुर्विमा, रोटरी या क्षेत्रात  कर्तुत्व सिद्ध करतानाच त्यांनी अन्य संस्थासाठीही कार्य केले आहे. त्यांच्या वाटचालीचा आलेख मांडण्यासाठी त्यांच्या जीवनावरील पुस्तक ही प्रकाशित झाले आहे.


यशस्वी उद्योजक आणि समर्पित समाजसेवक म्हणून ते अनेका साठी आदर्शवत ठरले आहेत. आपल्या सामाजिक जीवनातील समर्पित योगदानाबद्दल सर्जेराव सावंत यांना 


जीवन वैभव पुरस्कार 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सदर पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा