सोलापूर झेडपीत मंगळवेढ्याला संधी मिळण्याची शक्यता;शिला शिवशरण दावेदार - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

सोलापूर झेडपीत मंगळवेढ्याला संधी मिळण्याची शक्यता;शिला शिवशरण दावेदार



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान अनुसूचित जातीच्या उमेदवाराला मिळणार आहे. जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता सत्ता कुणाची येणार यावरच अध्यक्ष कोण होणार याची गणिते अवलंबून आहेत. अनुसूचित जातीचे पाच पुरुष व पाच महिला सदस्या जिल्हा परिषदेत आहेत. मात्र यंदा सोलापूर झेडपीत मंगळवेढ्याला संधी मिळण्याची शक्यता असुन समाजकल्याण सभापती शिला शिवशरण या दावेदार मानल्या जात आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814




समाधान आवताडे गटातील अपक्ष सदस्य जि . प .समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.तत्कालिन जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्याशी समाधान आवताडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने शीला शिवशरण यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी तत्कालीन सदस्य संजय शिंदे हे अपक्ष असतानाही त्यांनी भाजपच्या मदतीने अध्यक्षपद मिळविले होते. पण, जिल्हा परिषदेतील सध्याची राजकीय स्थिती खूपच किचकट झाली आहे.

समाजकल्याण सभापती शिला शिवशरण यांचे नाव सध्या आघाडीवरती आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत.माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्ष शिला शिवशरणच होणार अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमध्ये मंगळवेढ्यातील आवताडें गटाच्या जनहित आघाडीच्या विद्यमान समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले अनिरुद्ध कांबळे (करमाळा), राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले शिवाजी सोनवणे (मोहोळ), अतुल खरात (पंढरपूर), त्रिभुवन धाईंजे (पण, आता मोहिते-पाटील समर्थक), कॉंग्रेसचे संजय गायकवाड (दक्षिण सोलापूर) हे पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये भाजपच्या साक्षी सोरटे (माळशिरस), शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या स्वाती कांबळे, संगीता धांडोरे (सांगोला), कॉंग्रेसच्या रेखा गायकवाड (दक्षिण सोलापूर) हे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा