मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील भाजी मंडई येथे अज्ञात कारणावरून एकावर तलवारीने वार केल्याची घटना आज दुपारी १.१५ च्या सुमारास घडली आहे.यात भजी वडापाव गाडीचा मालक जखमी झाला आहे.धनंजय माईनकर (वय.२४ रा.शनिवारी पेठ सनगर गल्ली) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भाजी मंडई येथे भजी वडापाव गाडी मालकावर अज्ञात कारणावरून शेजारीच असणाऱ्या भजी वडापाव गाडी कामगाराने अज्ञात कारणावरून तलवारीने वार केले आहेत.यात त्याच्या डोक्यास मार लागला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस निरीक्षक अनिल गाडे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी,सचिन खटके, नामदेव कोळी, रेड्डी, प्रकाश नलवडे यांनी भेट दिली असुन जखमी युवकाला उपचारासाठी डॉ.रविंद्र नाईकवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा