मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-अकोला रस्त्यावर शहरालगतच्या शेतातील खड्यात साचललेल्या पाण्यात पोहोताना शाळकरी मुलगी बुडून मरण पावली.चित्रा दादा पाटोळे (वय १२,रा.मेडशिंगी,ता. सांगोला) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
इयत्ता सहावीत शिकणारी चित्रा पाटोळे ही शिक्षणासाठी आजोबांकडे मंगळवेढा येथे राहण्यास होती.आजोबा उत्तम चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी १० वाजता मोटरसायकलवरून जवाहरलाल शेतकी हायस्कूलमध्ये सोडले होते.
शाळा सुटल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास शाळेतील मैत्रिणींसह ती अकोला रस्त्यावरील कालव्यानजीकच्या मुजावर यांच्या शेतात गेली.
तेथील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरली. पोहोता येत नसल्याने चित्रा पाण्यात बुडाल्याचे तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आले. त्यांनी तेथील लोकांना सांगितले. तोपर्यंत बुडून तिचा मृत्यू झाला होता.
शुभम चव्हाण याने पाण्यात उतरून तिचा मृतदेह बाहेर काढला.तिच्या आजोबांना फोनवरून दुर्घटनेची खबर दिली.तिचे चुलत आजोबा अशोक पांडुरंग चव्हाण (वय ६० ,रा.शनिवार पेठ ,मंगळवेढा) यांनी येथील पोलिसांत खबर दिली.त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस नाईक योगिराज खिलारे तपास करीत आहेत.
मुलीला काय सांगू : आशा पाटोळे ( वय १४ ) , चित्रा पाटोळे ( वय १२ ) या दोघी बहिणी शिक्षणासाठी आजोबांकडे राहावयास होत्या . चित्रा हिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला . त्यामुळे मेडशिंगी येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला काय सांगूम्हणून आजोबाउत्तम चव्हाण धायमोकलून रडत होते . या घटनेनंतर नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा