मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दि.18 नोव्हेंबर रोजी संत नामदेव महाराज यांची पालखी आळंदी सोहळ्यासाठी दिवेघाटात मार्गक्रमण करतेवेळी ब्रेक फेल झालेला जेसीबी थेट दिंडी मध्ये घुसल्याने यात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प सोपान महाराज नामदास यांचे व अन्य वारकरी बांधवाचे निधन झाले आहे.
तरी प्रशासनाने त्वरीत त्या जेसीबी वाहनचालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर अशी शिक्षा करावी करण्यात यावी व ह.भ.प सोपान महाराज नामदास यांच्या व अन्य वारकरी बांधवाच्या वारसांना तात्काळ 25-30 लाख अपघाती निधी मिळावा या विनंतीचे निवेदन मंगळवेढा तहसीलदार व प्रांताधिकारी यांना अखिल भारतीय वारकरी मंडळ मंगळवेढा तालुका व शहर यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ मंगळवेढा तालुका व शहर चे तालुकाध्यक्ष निलेश गुजरे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर (माउली)भगरे,उपाध्यक्ष मल्लिकार्जुन राजमाने म,गोपाळ कोकरे, भिमराव पाटील, सतीश पाटील,भारत कोकरे,गजानन वेदपाठक,लक्ष्मण आवताडे, महादेव मेटकरी आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा