दिंडीमध्ये जेसीबी घुसून अपघात; नामदेव महाराजांच्या १७ व्या वंशजासह २ वारकरी ठार - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

दिंडीमध्ये जेसीबी घुसून अपघात; नामदेव महाराजांच्या १७ व्या वंशजासह २ वारकरी ठार




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूरवरुन आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये जेसीबी घुसून अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन वारकरी ठार झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता.19) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात घडला. जखमींना तात्काळ हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसला. याभीषण अपघातात नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास (वय ३६) आणि अतुल महाराज आळशी (वय २४) या दोघांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण अत्यवस्थ अवस्थेत आहे.

या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जखमींना तात्काळ हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले. या अपघाताची अधिक चौकशी केली जात आहे.

अपघातात मृत्‍युमुखी आणि जखमी झालेल्‍याची नावे :





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा