मंगळवेढ्यात अपघात सैनिकाचा मृत्यू ; पत्नी व दोन मुली गंभीर जखमी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १५ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात अपघात सैनिकाचा मृत्यू ; पत्नी व दोन मुली गंभीर जखमी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथील शाळेजवळ दुपारी ३ च्या सुमारास हुलजंती कडे जाणारा दुचाकीस्वाराने पाठीमागून बोलेरो गाडीला जोराची धडक दिल्याने यात सैनिक निळाप्पा मारुती घटनटी (वय.३० रा.मदरखंडी ता.जमखंडी जि.बागळकोट) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.



याबाबत सविस्तर माहिती अशी की,सासरवाडीकडे जाणाऱ्या डपळापूर ता.जत येथून हुलजंती कडे जाताना शिवणगी येथील शाळेजवळ बुलेट क्र.के.ए.४८.यु.८४६१ याने बोलेरो क्र.एम.एच.१४.सी.एस.७१९४ ही गाडी शिवनगी येथून देवदर्शनासाठी गाणगापूर कडे जात असताना पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्याने मेजर निळाप्पा घटनटी यांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये सविता निळाप्पा घटनटी(वय.२३),श्रुती (वय.४) व संचिता(वय.६) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा