मंगळवेढ्यात मेंढपाळास काठीने मारहाण माजी उपनगराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १५ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात मेंढपाळास काठीने मारहाण माजी उपनगराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा-मरवडे रोडवरील शेतात मेंढरे सोडल्याच्या कारणावरून कर्नाटक राज्यातील एका फिरस्त्या मेंढपाळास काठीने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मंगळवेढयाचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ माळी विरोधात मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 



याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक येथील भिवा सादेव खरात ( वय.35)  (रा.हात्तरगीवाडा ता.इंडी जि. विजापूर) हा व त्याचे वडील सादेव खरात हे दोघेजण काल रविवार दुपारी ३.१५ च्या सुमारास मंगळवेढा - मरवडे रोडवरील बोमण्णा मळा येथे मेंढरे घेवून आले होते. 



बोमण्णा मळा परिसरात असलेल्या एका मोकळया शेतात ते मेंढया घेवून गेले त्यावेळेस एक इसम त्यांचेजवळ आला व त्याने माझ्या रानात तु तुझ्या मेंढया का घुसवल्यास असे विचारले असता आम्ही गावोगाव मेंढया घेवून त्यांना चारण्यासाठी फिरतो येथून पुढे जात असताना आमच्या मेंढया चुकून तुमच्या रानात घुसल्या , मी लगेच त्यांना बाहेर काढतो असे सांगितले.



मात्र त्या इसमाने तुझ्या मेंढया इथे का सोडलास रे असे म्हणून शिवीगाळ करून काठीने भिवा सादेव खरात यांच्या डोकीत मारून जखमी केले . तो फिर्यादीबरोबर झोंबाझोंबी करीत असताना फिर्यादीच्या गळ्यात असलेले दोन सोन्याचे बदाम तेथे पडून गहाळ झाले अशी फिर्याद भिवा खरात याने मंगळवेढा पोलिसात दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गोपीनाथ नाना माळी ( रा . माळी गल्ली , मंगळवेढा ) विरूध्द भादंविसं कलम ३२४ , ४२७ , ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार नामदेव कोळी हे करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा