राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनास जि.प.सदस्या शैला गोडसे यांची एक लाख रूपयाची देणगी - Mangalwedha Times

Breaking

रविवार, १४ जुलै, २०१९

राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनास जि.प.सदस्या शैला गोडसे यांची एक लाख रूपयाची देणगी


 मंगळवेढा(प्रतिनिधी)ः

 मंगळवेढा येथे होणार्‍या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास जि.प.सदस्या व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी एक लाख रूपयाची देणगी दिली आहे.





3 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन होणार असून 4 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय पुरूष व महिलांचे संगीत संमेलन होणार आहे. या संयुक्त संमेलनासाठी आर्थिक मदत म्हणून शैला गोडसे यांनी एक लाख रूपये म.सा.प.शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांचेकडे सुपूर्द केले.

यावेळी नाटय परिषद नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, नाटय परिषदेचे उपाध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, संचालक लहू ढगे, म.सा.प.शाखा दामाजीनगरचे कोषाध्यक्ष अशपाक काझी यांचेसह सुदर्शन फुगारे, रेखा जडे, अर्चना सलगर, सुषमा सुतार, दया वाकडे आदि उपस्थित होते.






----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा