मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी येथील निर्भयाला श्रद्धांजली - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १३ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी येथील निर्भयाला श्रद्धांजली

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

कोपर्डी येथील निर्भयाच्या त्या दुर्देवी घटनेला शनिवारी (१३ जुलै) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळवेढा येथे या निमित्ताने सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 



यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे,संपादक समाधान फुगारे,नगरसेवक भारत नागणे, राहुल सावंजी,राजाभाऊ चेळेकर,प्रा.विनायक कलुबरमे,वारी परिवाराचे सतीश दत्तू,स्वप्नील फुगारे, सुदर्शन ढगे,बबलू कौडुभैरी आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन वर्षांपूर्वी राज्याला हादरविणारी घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या छोट्या गावात घडली. शनिवारी या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याने. मानवतेला काळीमा फासणाऱ्या कोपर्डीच्या घटनेविरुद्ध सर्व समाज पेटून उठला होता. 

देशात व देशाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डीमधील कृत्याचा निषेध करण्यासाठी व मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा