मंगळवेढ्यात दोन गटात तलवारीने मारामारी ; ३३ जणांविरूध्द गुन्हे दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १३ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात दोन गटात तलवारीने मारामारी ; ३३ जणांविरूध्द गुन्हे दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील देगाव येथे मंदिरात मुरुम टाकण्याच्या कारणावरून दोन गटात तलवारीने तुंबळ मारामारीचा प्रकार घडला असून या प्रकरणी दोन्ही गटाने एकमेकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी ३३ जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. 

1) गणपत ढेकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मुरुम टाकण्याच्या कारणावरून शरद डोईफोडे , समाधान बनसोडे , हिरालाल चोरमले , पोपट गोरे , तानाजी डोईफोडे , मोहन बनसोडे , भास्कर ढेकळे , भागवत ढेकळे , तानाजी ढेकळे , बाळू डोईफोडे , रानबा डोईफोडे , राजाराम बनसोडे , मंगेश चोरमले , किशोर ढेकळे , सुरेश चोरमले , नवनाथ चोरमले , अनिल ढेकळे आदीनी हातात तलवार घेवून मारणेसाठी अंगावर आले . तसेच हातावर , पाठीवर मारहाण केली. 


यावेळी ग्रामस्थ नानासाहेब ढेकळे , जगन्नाथ ढेकळे , शिवाजी माने यांनी येवून सोडवासोडवी केली . तदनंतर फिर्यादी हे भितीने धवलनगर येथील वस्तीवर गेले असता आरोपीने एम एच ०९ , ६९०७ या स्कार्पिओ गाडीत येवून वस्तीवरील घरात घुसून फिर्यादी व त्याची पत्नी छाया , मुलगा विनोद , मुलगी भाग्यश्री , चुलत मनोहर ढेकळे यांनाही हातातील काट्यांनी हातावर , पायावर , पाटीत , खांदयावर मारहाण केली , तसेच शर्टाच्या खिशातील ५ हजार १ जबरदस्तीन काढून घेतले , फिर्यादीची पत्नी छाया तीच्या गळयातील गंठण , जबरदस्तीन काढून घेतल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


2) तानाजी डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि . २१ जुलैच्या सायंकाळी ५ वा .मंगळवेढा पंढरपूरकडे जाणा - या रोडवरील देगाव बसस्टॉपजवळ गणपत देकळे व फिर्यादी यांच्यामध्ये मंदिरामध्ये मुरुम टाकण्याच्या कारणावरून शिवीगाळ  दमदाटीची घटना घडली होती. 

रात्री ७.४५ सुमारास एम.एच १३,७४९५ या जीपमध्ये गणपत ढेकळे , मनोहर ढेकळे , सुरेश ढेकळे , शशिकांत ढेकळे , गणपत ढेकळे , नितीन ढेकळे , विलास बनसोडे , विश्वास चौगुले , संतोष डोईफोडे , समाधान मेटकरी , शिवाजी माने , जालिंदर डोईफोडे , नाना ढेकळे , सुनिल ढेकळे , भारत डोईफोडे , राहुल ढेकळे , आनंदा डोईफोडे आदीनी येवून हातात काठ्या घेवून डोकीत मारून जखमी केले . तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या भांडणामध्ये अर्धा तोळा वजनाची १५ हजार रुपये किमतीची अंगठी तसेच ३ तोळे सोन्याचे लॉकेट , ९० हजार रुपये किमतीचे जबरदस्तीने काढून घेतल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दोन्ही गटातील ३३ जणांविरुध्द परस्पर गुन्हे नोंदविले आहेत , अधिक तपास पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नामदेव कोळी व पोलीस नाईक विक्रमसिंह राठोड हे करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा