मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यात मटका व्यवसाय चालविणाऱ्या ७ जणांना मुंबई पोलिस कायदयान्वये १६ महिन्यासाठी जिल्हयातून तडीपार करण्याचे आदेश मंगळवेढा पोलिसांना दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील पिंटू उर्फ विलास विष्णू कदम हा बुकीचालक असून यांच्या मार्गदर्शनाखाली सागर जकाप्पा केंगार(कात्राळ),जकाप्पा बन्नाप्पा केंगार(कात्राळ),सुरज सुभाष नकाते(बोराळे), बाळासाहेब बापू कदम(मरवडे),लक्ष्मण बसवंत बनसोडे(बोराळे),नागेश दत्तात्रय गवळी(बोराळे) आदी सदस्य हे बुकीचालक पिंटू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातून मटका व्यवसाय चालवित होते.
या ७ जणांवरती वेळोवेळी गुन्हे दाखल झाले आहेत.उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविल्यानंतर १६ महिन्याच्या कालावधीसाठी ७ जणांना तडीपार करण्यात आले असून या ७ तडीपार लोकांना हद्दपार कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा