मंगळवेढ्यात अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील असलेल्या फाट्यावर अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ४ च्या सुमारास घडली आहे.



दरम्यान मयत व्यक्ती ही प्रकाश हणमंत कुलकर्णी निहुर्गी ता.चडचन जि.विजापूर ही कर्नाटक राज्यातील असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मरवडे-चडचन रोडवरील असलेल्या बालाजीनगर फाट्यावर रोडलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला अज्ञात व्यक्तीने गळफास घेतला असल्याची प्राथमिक माहिती तेथील स्थानिक नागरीकांनी पोलिसांना दिली असून  घटनास्थळी पोलीस हवालदार सुनील गायकवाड,अनिल दाते हे दाखल झाले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा