काँग्रेसने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील जागेचा सस्पेन्स वाढविला - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

काँग्रेसने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील जागेचा सस्पेन्स वाढविला



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


काँग्रेस पक्षाने आज रविवारी ५१ उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचा सस्पेन्स त्यांनी वाढविला असल्याने इच्छुक उमेदवारांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ५१ उमेदावारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही विद्यमान आमदारांचा समावेश आहे तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच लातूरमधून आमित देशमुख, सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे, पलुस-कडेगावमधून विश्वजीत कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे.काँग्रेस कडून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या तरी सुरू असून दुसऱ्या यादीत मतदारसंघातील उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा