मंगळवेढ्यात शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील सिद्धाराम सूर्यकांत कपले (वय.२५) या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ च्या सुमारास मातृलिंग गणपती रोडवरील कपले डीपी येथे घडली आहे.



याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत सिद्धाराम कपले हा डीपीमध्ये फ्यूज टाकण्यासाठी सकाळी ७ च्या सुमारास गेला होता.

डीपी मध्ये फ्यूज बसवत असताना सिद्धाराम कपले याला शॉक लागून तो जागीच मयत झाला असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.

या घटनेनंतर सिद्धापूर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा