मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे म्हणून इथला उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ते मंगळवेढा येथील सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,उमेदवार सुधाकरपंत परिचारक,आ.प्रशांत परिचारक,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,कल्याण काळे,नगरसेवक अजित जगताप, माजी आ.शहाजी पाटील,शिवाजी सावंत,उमेश परिचारक,संभाजी शिंदे,शशिकांत चव्हाण,माजी सभापती शिवानंद पाटील,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,अरुण किल्लेदार आदीजन उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की,ज्या संख्येने जनता उपस्थित आहे.२४ तारखेला फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते थकले असल्याने सांगत आहेत. ते दोन्ही काँग्रेस चे विलीकरण होणार म्हणून बोलत आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादी ने आत्ताच हार मानली आहे.असा जाहीरनामा दिला आहे की आपण निवडून येत नाही म्हणून खोटे अवश्वान दिली आहेत. तेंच म्हणजे खोट बोल आणि रेटून बोल म्हणी प्रमाणे सांगत आहेत.
गेल्या पाच वर्षातील कारभार जनतेने पहिला आहे.त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे.दिशाभूल करणे खोटी आश्वासन देने यापलीकडे गेली १५ वर्ष यांनी काहीच केलं नाही.गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली,वेग वेगळी मदत मिळवुन दिली.
जो पर्यंत जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तो पर्यंत चारा छावण्या सुरू ठेवल्या. शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या शेतीलाही पाणी दिले.दुष्काळातही शेतकऱ्यांना दिलासा मिळवुन दिला.मंगळवेढ्यात आम्ही केलेल्या कामामुळेच शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे.पुराचे सगळे पाणी समुद्रात वाहून जाते तेच पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागासाठी देण्यासाठी योजना आखली जात आहे.नीरा कृष्णा स्थिरीकरण तयार केले.
आत्ता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे.या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ता बनविला.गेल्या पाच वर्षात गरिबांना घरे बांधून दिले पाणी मिळवून दिले.
२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील एक गरीब घरापासून वंचित राहणार नाही.प्रत्येक गरिबांना घर,पाणी, लाईट,गॅस देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे.प्रत्येक गरिबांच्या घराचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दिले आहे.बचत गटांना जोडण्याचे काम करून त्यांना बिनव्याजी कर्ज मिळवून दिले.देशात महाराष्ट्र पहिल्या नंबर पर्यंत आणण्याचे काम केले.
आरोग्य, शिक्षण अशा योजना गरिबांना मिळवून दिला.हजारो बालकांचे ऑपरेशन आरोग्य योजनेतून मोफत झाले आहेत.हे सामान्यांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे सरकार आहे.संत बसवेश्वर,चोखामेळा यांचे स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असून सुधाकरपंतांना निवडून द्या येथील सर्व योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्तावित आ.प्रशांत परिचारक,सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार औदुंबर वाडदेकर यांनी मानले.
शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते ताब्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी सैनिकांना ताब्यात घेतले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटना मतदारसंघ अध्यक्ष राहुल घुले यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासमवेत शहरातील काही प्रमुख माजी सैनिकांना देखील ताब्यात घेतले होते.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा