मंगळवेढयात आघाडीतील गोेंधळाला कंटाळून अंजली मोरे यांचा राजीनामा - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढयात आघाडीतील गोेंधळाला कंटाळून अंजली मोरे यांचा राजीनामा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सध्या सुरु असलेल्या आघाडीच्या गोंधळाला कंटाळून महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अंजली भिमराव मोरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या वतीने प्रा.शिवाजीराव काळुंगे तर राष्ट्रवादीच्यावतीने भारत भालके यांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे असे असताना दोन्ही काँग्रेसचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर एकमेकाविरूध्द लढत आहेत.

सध्या विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर्गत गट तट तसेच आघाडीसंदर्भात असलेले गोंधळाचे वातावरण लक्षात घेता या पदावर आपणास काम करणे शक्य नसल्याने आपण आपल्या काँग्रेस महिला तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र तालुकाध्यक्ष अंजली मोरे यांनी जिल्हाध्यक्षा इंदूमती अलगोंडा यांना पाठविले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा