मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एबी फॉर्मसाठी चुरस;काही तासच शिल्लक - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एबी फॉर्मसाठी चुरस;काही तासच शिल्लक




मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणूक रणसंग्रामासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्याचा एकच दिवस उमेदवारांच्या हाती उरलेला असून दुपारी तीन पर्यन्त पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म देण्याची मुदत असल्याने उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे.




आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी मित्र पक्षाला जागा सुटल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून विद्यमान आमदार भारत भालके व काँग्रेस पक्षाकडून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी अर्ज दाखल केला आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात दोघांनीही वेगळे वेगळे उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे दोघाना एबी फॉर्म दिल्यास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तर दुसरीकडे वंचित पण हिच अवस्था असल्याचे दिसून येते.

अधिकृत अर्ज दाखल करण्यास व पक्षाचे एबी फॉर्म दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या हाती अवघे काही तास शिल्लक आहेत.त्यामुळे वेळेत जे उमेदवार एबी फॉर्म देतील तेच पक्षाच्या चिन्हवरती निवडणूक लढवू शकतात त्यामुळे उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस असुन दुपारी 3 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा