मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या मंगळवेढा येथील एका डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे. कुंभार गल्ली परिसरातील मर्दा नर्सिंग होम व एक्स-रे क्लिनिक येथे बेकायदेशीर गर्भपात होत असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. डाँ.श्रीकांत किसनलाल मर्दा (वय.६७,कुंभार गल्ली,मंगळवेढा) गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डाँ श्रीकांत मर्दा यांनी दि.११ ऑक्टोबर रोजी ५ वा ते दि.१२ रोजी ६ वा चे दरम्यान तिन्हीही महिलांना त्यांचा बेकायदेशीर गर्भपात करण्याच्या उददेशाने त्यांचेकडून मोठया रक्कमा स्विकारून त्यांच्या 3 ते 3 . 5 वर्ष वयाच्या लहान मुलींना त्या आजारी नसताना खोटा दस्तऐवज तयार करुन ठकबाजी करुन उपचारकामी दाखल करून तिन्ही महिलांना गर्भपात करण्याचे इंजेक्शन देवून त्यांचा बेकायदेशिररित्या गर्भपात घडवून आणला आहे.
एकूण 3 स्त्रियांचे ( रूग्णांचे ) एम . टी . पी अँक्ट 1971 मधील तरतुदींचे उल्लंघन करून बेकायदेशिररित्या गर्भपात केला व दिलेल्या इंजेक्शनच्या रिकाम्या अँम्पुल्स पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने एका पत्राच्या डब्यात टाकून जाळून टाकल्या म्हणुन मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गाडे हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा