युवराज शिंदे यांचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

युवराज शिंदे यांचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज शिंदे व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे युवराज शिंदे व प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे यांनी आपल्या समर्थकासह मंगळवारी रात्री पाठिंबा दिला आहे.युवराज शिंदे हे काँग्रेसचे युवक अध्यक्ष होते.त्यांच्या पाठिंब्याने आवताडे गटाची मोठी ताकत शहरात वाढली आहे.

यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विष्णुपंत आवताडे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे,लक्ष्मण शिंदे,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेबाडे,राजेंद्र सुरवसे,पप्पू यादव,सरोज काझी,सत्येजित सुरवसे,बबलू डांगे,किशोर दत्तू आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवेढ्याचा आमदार झाला पाहिजे

मंगळवेढा येथील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी तालुक्यासाठी जो विकास कामाचा व प्रलंबित योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जो वसा उचलला आहे व मंगळवेढा येथील जनता पंढरपूरच्या उमेदवाराला आजपर्यंत निवडून देत होती पण मंगळवेढ्याचा आमदार झाला पाहिजे म्हणून आम्ही पाठिंबा दिला असल्याचे युवराज शिंदे व समाधान हेंबाडे यांनी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा