राज्यात 'या' जिल्ह्यात येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

राज्यात 'या' जिल्ह्यात येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पुणे, सातारा, कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि सातारा परिसरात येत्या 24 तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


या पावसामुळे काही भागांमध्ये पूर येण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे.  Heavy rains expected in Pune and Satara in next 24 hours




राधानगरीचे 4 दरवाजे उघडले


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून27112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणाला एकूण 7 दरवाजे आहेत. सतत पाऊस सुरू असल्याने आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.


सांगलीत कृष्णा नदीने 31 फुटाची पाणी पातळी ओलांडली आहे. तर कोयना धरणातून विसर्ग सुरुच आहे. या भागात नदी काठच्या लोकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे.


ब्रेकिंग बातम्यांसाठी भेट द्या : www.mangalwedhatimes.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा