आ.भारत भालकेंच्या आजपासून मंगळवेढ्यात विचारविनिमय बैठका - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

आ.भारत भालकेंच्या आजपासून मंगळवेढ्यात विचारविनिमय बैठका


0

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विधानसभेच्या निवडणुका संदर्भात भारत भालके प्रेमींची पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचारविनिमय बैठक मंगळवेढा तालुक्यात आज २६ जुलै पासून सुरू होत आहे.




बोराळे जिल्हा परिषद गटाची बैठक माचणूर येथे डोके वस्तीवर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

मरवडे पंचायत समिती गणाची बैठक दुपारी १२.१५ वाजता संजय पवार यांच्या मरवडे रोड येथील घरी व हुलजंती गणाची बैठक त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मरवडे येथे आयोजित करण्यात आली आहे. 

शनिवारी दि.२७ जुलै रोजी भोसे जिल्हा परिषद गटाची बैठक तानाजी पाटील यांच्या भोसे येथील शाळेवर आयोजित करण्यात आली आहे. 

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाची बैठक शनिवार दि.२७ जुलै रोजी दुपारी १ वाजता बाळासाहेब जांभळे यांच्या गुंजेगाव येथील घरी आयोजित करण्यात आली आहे. 

या सर्व बैठकींना भालके प्रेमी कार्यकत्याँनी गटाच्या पदाधिका - यांनी उपस्थित राहावे  असे आवाहन संयोजकांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा