मंगळवेढ्यात जनहित संघटनेचा काळ्या फीती लावून पोलीस प्रशासनाचा निषेध - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात जनहित संघटनेचा काळ्या फीती लावून पोलीस प्रशासनाचा निषेध





मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील सर्जेराव गाडे यांना काही कारण नसताना कोणतीही चौकशी न करता काठी तुठे पर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल सपोनि वैभव मारकड व त्यांचे पाच सहकारी यांचे वरती त्वरित गुन्हा दाखल करून  निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने बुधवारी काळ्या फीती लावून पोलीस प्रशासनाचा केला निषेध आहे.



याप्रसंगी मराठा आडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष संभाजी मुरडे,पोपट पडवळे,रियाज मुजावर,रघु चव्हाण,अन्यायग्रस्त सर्जेराव गाडे,दामाजी मोरे,पप्पू दत्तू,शिवाजी कांबळे,महादेव भोजने,परमेश्वर येनपे,दामू कांबळे,राजेंद्र सावळे,विठ्ठल गाडे,सुधाकर कांबळे,बलभीम माळी,मारुती भोरकडे,मधुकर  कोंडूभैरी यांच्यासह मोठ्या संख्येने नंदूर ग्रामस्थ उपस्थित होते.

जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे गेल्या सहा दिवसा पासून मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत.

पोलीस प्रशासन हे डोळे असून आंधळा ची व कान असून बहिरा ची भूमिका घेत आहेत. या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.त्यामुळे या पोलिस प्रशासनाचा निषेध म्हणून बुधवारी मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला.या आंदोलनाची दखल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लवकरात लवकर घ्यावी अन्यथा जनहित शेतकरी संघटना पोलीस आधीक्षक कायालयासमोर हजरोंच्या संखेने आदोलन करुन तुमची वर्दी उतरवल्या शिवाय गप्प बसणार नाही असेही देशमुख म्हणाले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा