मंगळवेढ्यात आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांतराव परिचारक संयोजन समिती मंगळवेढा यांच्या वतीने आज शुक्रवारी रोजी सकाळी १० वाजता शिवप्रेमी चौक येथे प्रथमच भव्य व खुल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, कबड्डी खेळाडूंनी व कबड्डी चाहत्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  





या स्पर्धेचे उद्घाटनसोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी ना.विजयकुमार देशमुख (मालक) यांच्या हस्ते व माजी पालकमंञी प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेसदर च्या स्पर्धे करीता प्रमुख उपस्थिती युटोपीयन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक व जिल्हा परीषद सदस्य वसंतनाना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार  आहे.










ग्रामीण भागात प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून या खेळाची माहिती व प्रसार व्हावा या उद्देशाने सदर च्या प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा या दामाजीपंतांच्या भूमीमधून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमविलेले आहे. मात्र, प्रो-कबड्डी या खेळासही भरपूर वाव असल्याने या खेळाची माहिती,नियम,व खेळ या भागातील खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना माहिती व्हावा व या खेळाचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रेमी चौक आठवडा बाजार,मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक २३/०८/२०१९ रोजी सकाळी ठिक १० वाजता भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा