समाधान आवताडेंचे झुल्फिकार काझीकडून तैलचित्र भेट - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

समाधान आवताडेंचे झुल्फिकार काझीकडून तैलचित्र भेट




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

कलावंतांची इच्छाशक्ती प्रबळ असते, जिथे कुणी पोहोचू शकत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहोचते. मंगळवेढा येथील हौशी कलावंत झुल्फिकार काझी यांनी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे तैलचित्र रेखाटले व उद्योजक संजय आवताडे यांना भेट दिले आहे.



यावेळी सुशील आवताडे,आबा पवार,सरोज काझी,जमीर इनामदार,नितीन सावंजी आदीजन उपस्थित होते.

समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.त्यांनी संत दामाजी सहकारी साखर कारखाना व्यवस्थित चालवून कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांचे तैलचित्र काढून भेट देण्यात खूप आनंद व्यक्त होत असल्याची भावना झुल्फिकार काझी यांनी व्यक्त केली.

सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे तैलचित्र रेखाटणे आणि त्यांना ते स्वत:च्या हाताने भेट देत त्यांचा अभिप्राय मिळवणे हा झुल्फिकार काझी यांचा छंद. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा