आवताडे परिवाराकडून ज्योत घेऊन आलेल्या भक्तांना फराळ वाटप - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

आवताडे परिवाराकडून ज्योत घेऊन आलेल्या भक्तांना फराळ वाटप




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा –सोलापूर रोडवरील टोल नाक्याजवळ ज्योत घेवून येत असलेल्या भक्तांना आवताडे परिवाराकडून फराळ वाटप करण्यात आली.





यावेळी उद्योजक संजय आवताडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे,विष्णुपंत आवताडे,माजी नगरसेवक अरुण किल्लेदार,भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,अँड.विनायक नागणे,जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,प्रभू घुले, जयंत पवार,नवनाथ पवार,बजरंग पवार,महादेव माने, दामोदर मुदगुल,बबन सावंत,एल.डी. पवार, मदन पाटील, शिवाजी बोमन्ना,राजू घुले,बंडोपंत बुरजे, दामोदर जाधव,दादा डोंगरे आदि उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील नवरात्र उत्सव मंडळाच्या तरूणांनी नवरात्र उत्सवाची ज्योत आणली आहे. दुर्गा उपासनेसाठी प्रसिध्द असणाऱया नवरात्र उत्सव सध्या मंगळवेढा तालुक्यात मोठय़ा भक्तीभावाने व उत्साहाने साजरा केला जातो . मंगळवेढा तालुका हा नवरात्रोत्सवासाठी प्रसिध्द असणारे गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. 

मंगळवेढा तालुक्यातून तुळजापूर,वाई व कोल्हापूर येथे ज्योत आणण्यासाठी गेलेले मंडळ घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे आज रविवारी मंगळवेढा येथे आगमन झाले.नवरात्र उत्सवाची ज्योत घेवुन पायी दौडीने निघालेल्या नवरात्र उत्सव मंडळाचे विविध शहरात उत्साही व भक्तीभावाने स्थानिक लोकांनी स्वागत केले. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा