एस.टी बस व टेम्पोची समोरासमोर धडक;मंगळवेढयातील ५ जण जखमी - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

एस.टी बस व टेम्पोची समोरासमोर धडक;मंगळवेढयातील ५ जण जखमी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सांगोला डेपोची एस.टी बस  सोलापूर येथून मंगळवेढा दिशेने येत असताना इचगाव येथे एस.टी बस (एम.एच.१४.बी.टी.३१०९) व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने यात चालक गंभीर जखमी झाला असून मंगळवेढयातील ५ ते ७ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



सोलापूर येथून ही बस मंगळवेढा कडे येत असताना आयशर टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जखमी प्रवाशांना मंगळवेढा येथील संजविनी हॉस्पिटलमध्ये तर काहींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात तर कामती व सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.

मंगळवेढा येथील प्रवाशांवरती संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र नावे संमजू शकली नाहीत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा