आमदार भारत भालके राष्ट्रवादीकडुन निवडणूक लढविणार - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

आमदार भारत भालके राष्ट्रवादीकडुन निवडणूक लढविणार



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निच्छित मानले जात आहे.



गेल्या अनेक दिवसापासून आमदार भारत भालके हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.मात्र भालके यांनी भाजप मध्ये न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आमदार भारत भालके यांनी गेली काही दिवस निर्णय गुलदस्त्यात ठेवला होता त्यामुळे कोणत्याच उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. भालकेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

आज संध्याकाळ पर्यंत आमदार भारत भालकेंची अधिकृत उमेदवारी बाबत घोषणा होण्याची शक्यता असून यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आहे.त्यानंतरच भालके राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा