लक्ष्मणराव ढोबळेंनी पाणी प्रश्न मार्गी न लावता १२५ संस्था नावावर केल्या : आमदार भारत भालके - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

लक्ष्मणराव ढोबळेंनी पाणी प्रश्न मार्गी न लावता १२५ संस्था नावावर केल्या : आमदार भारत भालके



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

चार वेळा आमदार झालेले लक्ष्मणराव ढोबळे यांचे उच्च शिक्षण असून देखील पाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही.पाणी प्रश्न न मार्गी लावता त्यांनी १२५ संस्था स्वतःच्या नावावर केल्या असल्याचा आरोप आमदार भारत भालके यांनी केला आहे.ते ढवळच,धर्मगाव,मूढवी,बठाण,उचेठाण,माचनूर गावात आयोजित प्रचार्थ सभेत बोलत होते.




यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बोरळचे सरपंच सचिन नकाते,तानाजी खरात,मूढवीचे सरपंच तानाजी रोकडे,प्रज्वल शिंदे,माजी नगराध्यक्ष भारत नागणे,नगरसेवक प्रवीण खवतोडे,राहुल सावंजी,मुज्जीमल काझी,यशवंत खताळ,सुरेश पाटील,प्रवीण टकले,युवराज घुले आदीजन उपस्थित होते.



भालके पुढे बोलताना म्हणाले की,सलग चार वेळा आमदार असून देखील ढोबळेंनी महिलांच्या डोक्यावरील पाण्याची घागर उतरवली नाही.त्यांनी जनतेची दिशाभूल केली.त्यांनी शिकून १२५ संस्था स्वतःच्या नावावर केल्या.

विकासाची ही निवडणूक आहे.माझा १० वर्षाचा अनुभव जनतेला माहिती आहे. वय ८५ झाले असताना आमदारकी पाहिजे कशाला घरात एक आमदार असताना दुसरा कशाला असा प्रश्न त्यांनी विरोध उमेदवाराला विचारला आहे.

दुष्काळी भागासाठी पाणी,पीक विमा योजना असुदे यासाठी मी संघर्ष केला आहे. ४ हजार शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांची रक्कम मिळवून दिले.२५ वर्ष आमदार असताना पंढरपूर येथे औद्योगिक वसाहत का झाली नाही.जे करत होते त्यांची अडवणूक केली.२०१४ मध्ये पुतण्या उभा असताना ही योजना खोटी आहे अशी खोटी माहिती त्यांनी जनतेला सांगितली.

देशाचे सैनिक सीमेवर असतात आणि इथले परिचारक त्याच्याविषयी अपशब्द बोलतात हे कसले दुर्दैव.अनेकांच्या जागा बळकावल्या खून मारामाऱ्या केल्या १० वर्षात २६७ प्रश्न मी विधानसभेत मांडले.जुन्या कलावंतांना वाढीव मानधन मिळावे यासाठी मी आवाज उठवला.आरोग्यासाठी मी कोणतेही राजकारण न करता मी माझे पत्र दिले आहे.

या सरकारला सुधारित योजना काढण्यासाठी भाग पाडले.पण यात काही गावे कमी केली.त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.परिचारक आमदार असून ते सांगतात मी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे मग पाणी प्रश्न का सुटला नाही.राजकारण करत असताना कुणाच्या कामात ढवळाढवळ अथवा कुणाचे काम अडविले नाही.टीका करताना सांभाळून टीका करा असा सूचक इशारा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा