मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील आडात व्यापारी तात्या कोंडुभैरी यांनी जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मंडल यांना देवीसाठी चांदीचा मुकुट दिला असून यासाठी मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी कमी वेळेत कमी वजनात मुकुट अतिशय आकर्षक बनवून दिल्यामुळे जयदीप रत्नपारखी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
न्यू जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मंडल कोंडुभैरी गल्ली येथील देवीसाठी तात्या कोंडुभैरी यांनी देवीसाठी चांदीचा मुकुट ऑर्डर दिली होती.मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे मालक जयदीप रत्नपारखी यांनी दीड किलो वजनाचा मुकुट अतिशय आकर्षक व कमी वजनात कमी वेळेत बनवून दिला आहे.
न्यू जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाचे अमित कोंडुभैरी,अक्षय कोंडुभैरी, यांच्याकडे ज्वेलर्सचे मालक जयदीप रत्नपारखी व सौरभ रत्नपारखी यांनी सुपूर्द केला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा