मंगळवेढा-पंढरपूरात आघाडीत बिघाडी,भालकेंच्या पाठोपाठ काळुंगेची उमेदवारी जाहीर - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढा-पंढरपूरात आघाडीत बिघाडी,भालकेंच्या पाठोपाठ काळुंगेची उमेदवारी जाहीर



मंगळवेढा : समाधान फुगारे

काॅंग्रेसने बुधवारी मध्यरात्री आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामध्ये मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे.मात्र, राष्ट्रवादीनेही या मतदारसंघासाठी भारत भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे.यामुळे मतदार संघात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.




आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, काॅंग्रेसने या जागेवर उमेदवार उभा केल्याने आघाडीत बिघाडी होणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

मुंबई काँग्रेसने बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली . यात २० उमेदवाराचा समावेश आहे . विशेष म्हणजे काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी असतानाही पंढरपूरमधून दोन्ही काँग्रेसने एकमेकाविरोधात उमेदवार दिले आहेत . नुकतेच आलेले भारत भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे त्यांच्याविरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली.

भालकेच्या उमेदवारीनंतर आपल्याला संधी नाही म्हणून शिवाजीराव काळुगे निवांत होते.अपक्ष व काँग्रेसकडून असे दोन्ही अर्ज भरायच्या तयारीत ते होते. रात्री उशिरा जाहीर झालेल्या काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव येणे , हे त्यांनाही अपेक्षित नव्हते. पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा