कांदा उत्पादकांचे अनुदान त्वरित जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरू : राजकुमार स्वामी - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

कांदा उत्पादकांचे अनुदान त्वरित जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरू : राजकुमार स्वामी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अजूनही गत वर्षीच्या अनुदानापासून वंचित असून येत्या आठ दिवसात अनुदान न मिळाल्यास प्रहार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिली आहे.



वर्ष उलटून गेलं तरी अद्याप मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी अजून सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदानापासू वंचित आहेत.एक तर मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.त्यामध्ये थोडा फार का होईना आधार भेटेल म्हणून तो कांदा अनुदान आज भेटेल उद्या भेटेल या प्रतिक्षेत बसला असून अद्यापही तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानापासू वंचित आहेत याकडे लक्ष द्यायला ना सत्ताधारी पक्षाला वेळ आहे ना विरोधी पक्षाला वेळ आहे.

जर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान न मिळाल्यास प्रहार शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले असा इशारा प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी प्रांताधिकादाराना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी अतुल चव्हाण, हनुमंत चव्हाण ,आप्पा बनसोडे नंदुर चे सरपंच परमेश्वर येनपे , बाबा इनामदार, अण्णाप्पा चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा