मंगळवेढा-पंढरपूर उमेदवारी अर्ज छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढा-पंढरपूर उमेदवारी अर्ज छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी २५२-पंढरपूर विधानसभा मतदासंघात निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज शनिवार दिनांक 0५ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. यामध्ये २९  उमेदवारंपैकी पैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली उमेदवारी अर्ज छाननीच्या संपूर्ण प्रक्रीयेवेळी मुख्य निवडणूक निरिक्षक विरेंद्र सिंग बंकावत उपस्थित होते.


   
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २९ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी २८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे वैध ठरविण्यात आली असून यामध्ये रविंद्र दिवाकर सर्वगोड (बसपा) या उमेदवाराने राजकीय पक्षाचा ‘अ’ व ‘ब’ फॉर्म नामनिर्देशन  पत्रासोबत सादर न केल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे.
       
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी  भारत  तुकाराम भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), शिवाजीराव बाजीराव काळुंगे (इंडीयन नॅशनॅलिस्ट कॉग्रेस), सारिका रविंद्र सर्वगोड (बहुजन समाज पार्टी), सुधाकर रामचंद्र परिचारक (भारतीय जनता पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महा पार्टी), सतिश अशोक पाटील (संघर्ष सेना), ॲड. मारुती कृष्णा अवचारे (बहुजन विकास आघाडी), दत्तात्रय तात्या खडतरे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून आवताडे समाधान महादेव,सुदर्शन रायचंद खंदारे, हनुमंत विठ्ठल बिराजदार, गोडसे शैला धनंजय, जुबेर लतिफ बागवान, माने संतोष महादेव, प्रताप पांडूरंग कांबळे, आप्पासाहेब दामोदर भोसले, ॲड.लोकरे शिवलाल कृष्णा, प्रा. इंजि.नामदेव शेकाप्पा थोरबोले पाटील, निशिकांत बंडू पाटील, अब्दुलरऊफ जाफर मुलाणी, अकुंश महादेव शेंबडे,  सोनकांबळे लक्ष्मण शंकर, बिराप्पा मधुकर मोटे, अनिल बोदाडे, सुनिल सुरेश गोरे, आण्णासो सुखदेव मस्के, रामचंद्र नाना परचंडे, बिराप्पा ईश्वर वाघमोडे या उमेदवारांचे अर्ज  वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी यावेळी दिली

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ०७ ऑक्टोबर २०१९ रोजी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी  यावेळी दिली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा