मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शेतात पेरणी करायची नाही असे म्हणून बघून घेण्याची धमकी देवून कु-हाडीने हल्ला केल्याने यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाल्याने प्रल्हाद सोपान गायकवाड व दत्ता प्रल्हाद गायकवाड या बाप लेकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही घटना भाळवणी येथे घडली आहे.
या घटनेची हकिकत अशी ,यातील फिर्यादी सतीश जाधव (वय ४०) व फिर्यादीची आई मंगल सुखदेव जाधव (रा .भाळवणी) यांच्यावर दि . २ रोजी दुपारी २ वा . आरोपी प्रल्हाद गायकवाड व दत्ता गायकवाड या दोघांनी पाण्याच्या चारीवरून झालेला मागील भांडणाचा राग मनात धरून शेतात येवून शेतात पेरणी करायची नाही असे म्हणून धमकी देवून शिवीगाळ करत फिर्यादी व फिर्यादीची आई तीच्या हातावर कु - हाडीचे घाव घालून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान,जखमींना सोलापूरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.अधिक तपास पो.हे.कॉ गायकवाड हे करीत आहेत.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा