मंगळवेढ्यातील महात्मा गांधी पुतळ्याकडे राजकीय नेत्यांनी फिरवली पाठ - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढ्यातील महात्मा गांधी पुतळ्याकडे राजकीय नेत्यांनी फिरवली पाठ




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवेढा येथे असलेल्या गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती आज देशभर साजरी करण्यात आली आहे.मात्र मंगळवेढ्यातील राजकीय नेत्यांना गांधी जयंतीचा विसर पडल्याचे दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले आहे.

मंगळवेढा शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भीमराव मोरे सर व सौ.अंजली मोरे या जोडप्याने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा