सुधाकरपंत परिचारकांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या मंगळवेढ्यात सभा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

सुधाकरपंत परिचारकांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या मंगळवेढ्यात सभा




मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मंगळवेढा येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे प्रभारी निरीक्षक अविनाश कोळी यांनी दिली.



याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,युटोपीयन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,भाजपचे शशिकांत चव्हाण,माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड,नगरसेवक अजित जगताप,माजी सभापती शिवानंद पाटील, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,अरुण किल्लेदार, धनंजय खवतोडे,विजय बुरकुल,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,संतोष मोगले,औदुंबर वाडदेकर,खन्ना माळी,भारत पाटील,काशिनाथ पाटील आदीजन उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेस मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात आले असता त्यांना वेळेअभावी मंगळवेढा येथे येता आले नाही.त्यामुळे आज त्यांनी मंगळवेढा येथे सभा घेणार असल्याचे सांगितले.


पहिली सभा मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघासाठी ठेवली आहे.मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहेत. त्यासाठी ते मंगळवेढा येथे येत आहेत. ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

पुढच्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली जाणार आहेत त्यामध्ये मंगळवेढा तालुक्याचाही सहभाग आहे.सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान राहुल शहा यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा