छावा संघटनेचा येत्या रविवारी मंगळवेढ्यात स्नेह मेळावा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

छावा संघटनेचा येत्या रविवारी मंगळवेढ्यात स्नेह मेळावा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अखिल भारतीय छावा संघटना मंगळवेढा यांच्या वतीने येत्या रविवारी प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. 

या मध्ये तालुक्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होणार असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात संघटनेची भुमिका व अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश देखील या वेळी होणार आहे त्यामुळे बाबत हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवेढा येथील सप्तशृंगी मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छावा संघटना वि. आ. तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा