सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी आज मंगळवेढयात येणार - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी आज मंगळवेढयात येणार


टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी दर्शनासाठी आज बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी युटोपियन शुगर्स येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दुध संघाचे संचालक औदूंबर वाडदेकर यांनी दिली. 



सुधाकरपंत यांचा अस्थिकलश सकाळी ९ ते ११ या वेळेत युटोपियन शुगर्स येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून ११.०० वा . सदरचा अस्थिकलश विसर्जनासाठी पंढरपूरकडे रवाना करण्यात येणार आहे. 


तरी सर्वांनी ९ ते ११ या वेळेत सोशल डिस्टन्सीचे पालन करून अस्थिदर्शनासाठी यावे असे आवाहन औदुंबर वाडदेकर यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा