शिवांशू ज्वेलर्समध्ये सोने-चांदीच्या खरेदीवर 402 ग्राहकांना मिळाले मोफत चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

शिवांशू ज्वेलर्समध्ये सोने-चांदीच्या खरेदीवर 402 ग्राहकांना मिळाले मोफत चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम



समाधान फुगारे । 7588214814


मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील शिवांशू ज्वेलर्समध्ये खास दीपावली निमित्ताने सुरू केलेल्या सोने चांदीच्या खरेदीवर मोफत चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम ही योजने अंतर्गत 402 ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती संचालक गणेश इंगळे यांनी दिली आहे.


दरम्यान या योजनेला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने महिला वर्गात या अनोखी ऑफर्सची क्रेझ निर्माण झाली होती.


औदुंबर कॉम्प्लेक्स बळीराजा पतसंस्थे शेजारी असलेले शिवांशू ज्वेलर्स मध्ये खास दीपावली निमित्ताने ग्राहकांना फायदेशीर अशी योजना आणली होती. ही योजना दि.30 नोव्हेंबर पर्यंत सुरू होती.


आत्तापर्यंत 402 ग्राहकांनी या योजनेचा फायदा घेतला असून या निमित्ताने ग्राहकांच्या घरी चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम मिळत असल्याने आलेल्या ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात होते.


यामध्ये ग्राहकांनी 10 हजार रुपयांच्या खरेदीवर लहान आकाराची पिवर चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम मोफत दिली आहे. तसेच 50 हजार रुपयांच्या खरेदीवर मध्यम आकाराची पिवर चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम भेट म्हणून दिली आहे.


तर 1 लाख रुपयांच्या खरेदीवर मोठी आकाराची पिवर चांदीची लक्ष्मी व गणेश मूर्ती प्रेम मोफत ग्राहकांना दिली आहे.


दरम्यान  बी.एस.आई.हॉलमार्क दागिने,संवर्ण संचय योजना (आर.डी),वन ग्रॅमचे आकर्षक दागिने व ज्योतिषशास्त्रानुसार राशींचे प्रमाणित रत्न योग्य दरात मिळत आहेत.


या योजनेचा लाभ ग्राहकांनी घेतल्या बद्दल शिवांशू ज्वेलर्सचे संचालक गणेश इंगळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा