मंगळवेढ्यात आज सर्वपक्षीयांच्या वतीने दिवगंत आमदार भारत भालकेंसाठी शोकसभेचे आयोजन - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

मंगळवेढ्यात आज सर्वपक्षीयांच्या वतीने दिवगंत आमदार भारत भालकेंसाठी शोकसभेचे आयोजन



टीम मंगळवेढा टाईम्स ।

दिवगंत आ.भारत (नाना) भालके यांना अकाली मृत्यूने मंगळवेढ्यात गोरगरीबाचा आधारवड कोसळला.आज शुक्रवार दि.4 डिंसेबर रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅ.शहराध्यक्ष मुझ्झमील काझी यांनी दिली.



    
दि.27 नोव्हेंबर रोजी पुणे येथील रूबी रूग्णालयात उपचारा दरम्यान आ.भारत भालके यांचा मृत्यू झाला.



मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील मागील 11 वर्षात आमदार म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांच्या सुखदुखात थेट सहभागी होत उपस्थिती लावल्यामुळे जनतेचे मनावर एक वेगळी छाप पाडून आ.भालके हे जनतेचे सलग तीन वेळा आमदार ठरले.


त्यांनी 2009 पासून प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवून बलाढ्य आशा उमेदवारांना चितपट केले. यावरून मंगळवेढा व पंढरपूर मतदार संघात त्याची लोकप्रियता दिसून येते.


विधानसभेतही तालुक्यातील रखडलेले प्रश्न उपस्थित करून कणखर आवाजाने विधानसभा घुमवून राज्यकर्त्याचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला.



त्याचे आत्मेस शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करणेचे उददेशाने मंगळवेढा तालुक्यातील सर्व पक्षीय श्रद्धांजली वहानेसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्कचा वापर करून मारूती पटांगण मंगळवेढा येथे साय 6 वा हजर राहावे असे आवाहन करण्यात आले.




राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा