मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील बस स्टँड समोर असलेल्या दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज बुधवार दि.२४ जुलै रोजी मोफत मोफत छातीरोग व दमा निदान शिबीर आयोजित केली असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदेश पडवळ यांनी दिली आहे.
या शिबिरामध्ये दमा रोगाचे निदान करून तपासणी केली जाणार आहे.तसेच तज्ज्ञांचा सल्ला देखील मोफत देण्यात येणार आहे.
आज बुधवार दि.२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत ह्रदयरोग,मधुमेह व श्वसनरोग तज्ञ डॉ.मंगेश टोणपे हे मोफत तपासणी करणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा