मंगळवेढ्यात महिलेचा विनयभंग ;एकाविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २४ जुलै, २०१९

मंगळवेढ्यात महिलेचा विनयभंग ;एकाविरूध्द गुन्हा दाखल





मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील ३० वर्षीय महिला घराकडे पायी चालत जात असताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इसाक पैगंबर शेख (रा.मुलाणी गल्ली) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी ही शाळेत एकटी असल्याचे पाहून आरोपी इसाक शेख हा मोटर सायकलवर येवून फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादीच्या समोर चकरा मारत होता. 




घडला प्रकार घरी सांगण्यासाठी फिर्यादी ही रस्त्याने पायी घराकडे चालत जात असताना, शिवप्रेमी चौकात आरोपीने शाईन मोटर सायकलवर येवून फिर्यादीचा रस्ता अडवून तीच्या दोन्ही पायाच्या मध्यभागी मोटर सायकलचे समोरील चाक घातले यामध्ये फिर्यादीच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. 

या दरम्यान फिर्यादीस खालच्या पातळीवर येवून शिवीगाळ करीत तीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून आता तुला सोडणार नाही असे धमकावून तो निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार कोळी करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा