मंगळवेढा येथे प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी एक लाख रूपयाची देणगी दिली आहे.
सदरचा धनादेश त्यांनी संयोजन समितीचे सदस्य यतिराज वाकडे यांच्याकडे दिला. यावेळी संयोजन समितीचे सदस्य तथा म.सा.प. दामाजीनगर शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जडे, स्वर संगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, क्रिकेट असोसिएशन मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.शरद शिर्के , उद्योजक संजय आवताडे, नाट्य परिषदेचे संचालक लहू ढगे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य दिगंबर यादव, राहूल शिंदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा