मंगळवेढयात राज्यस्तरीय संमेलनासाठी अभिनेते प्रदिप पटवर्धन, दिगंबर नाईक, अभिनेत्री गायत्री जाधव, गायक मोहम्मद आयाज, आर.जे.पल्लवी मंगळवेढयात येणार - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २२ जुलै, २०१९

मंगळवेढयात राज्यस्तरीय संमेलनासाठी अभिनेते प्रदिप पटवर्धन, दिगंबर नाईक, अभिनेत्री गायत्री जाधव, गायक मोहम्मद आयाज, आर.जे.पल्लवी मंगळवेढयात येणार





मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी होणार्‍या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनासाठी महाराष्ट्रातील मान्यवर अभिनेते, अभिनेत्री, साहित्यिक, गायक, निवेदक असे अनेक कलावंत मंगळवेढा येथे येणार असल्याने मंगळवेढा परिसरात सदरच्या संमेलनाविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

सुरसंगम ग्रुप, म.सा.प.शाखा दामाजीनगर व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने श्रीराम मंगल कार्यालयात 3 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महिलांचे साहित्य संमेलन होणार असून या साहित्य संमेलनास बबन चित्रपटफेम अभिनेत्री गायत्री जाधव व मान्यवर साहित्यिक हजेरी लावणार आहेत

 तर दुसर्‍या दिवशी 4 ऑगस्ट रोजी होणार्‍या संगीत संमेलनास अभिनेते प्रदिप पटवर्धन, दिगंबर नाईक,बबन मराठी चित्रपट  फेम अभिनेत्री गायत्री जाधव, महाराष्ट्राचा महागायक मोहम्मद आयाज, 92.7 बीग एफ.एम.च्या आर.जे.पल्लवी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या दोन्ही संमेलनासाठी राज्यभरातून सुमारे 125 जणांनी आपला सहभाग नोंदवला असून सर्व स्तरातून संमेलनाला चांगला प्रतिसाद असल्याने मंगळवेढा येथे होणारे पहिले राज्यस्तरीय साहित्य व संगीत संमेलन न भूतो न भविष्यती ठरेल अशी प्रतिक्रिया साहित्यिक व कलावंतातून व्यक्त केली जात आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा