मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे 30 ऑगस्ट पूर्वी भूमिपूजन करणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २२ जुलै, २०१९

मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे 30 ऑगस्ट पूर्वी भूमिपूजन करणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

वीरशैव लिंगायत समाजातील श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर यांचे सोलापूर  जिल्ह्यातील मंगळवेढा येथील राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट पूर्वी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या  बैठकीत केली. 

या बैठकीस ओबीसी खात्याचे मंत्री डॉ. संजय कुटे, सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख.खासदार डॉ. जयसिद्देश्र्वर महास्वामिजी. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  भूषण गगराणी यांच्या सहित ओबीसी  खात्यांचे  व विविध खात्यांचे महत्त्वाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. 




तर लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक  काकासाहेब कोयटे, अध्यक्ष सुनील रुकारी, कार्याध्यक्ष सरलाताई पाटील.गुरुनाथ बडूरे.राजाभाऊ मुंडे .उदय चौंडे.माजी आ.मनोहर पटवारी. राजकुमार मजगे. ऍड शैलेश हावनाळे .प्रदीप वाले.प्रा. संगमेश्वर पानगावे. लक्ष्मण उळेकर .अनिल रुद्रके.श्रीकांत तोडकर. आर्किटे्चर संजीव तोडकर. प्रा सुदर्शन बिरादार.प्रदीप फाले.यांच्या सहित लिंगायत संघर्ष समन्वय समितीचे  राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 

काकासाहेब को यटे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने सत्कार केला. या बैठकीत मुख्यमत्र्यांनी स्मारकाचा आराखडा लवकरच  उच्चस्तरीय बैठक घेऊन मंजुरी घेण्यात येईल व ३० पूर्वी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या भूमिपूजन मंगळवेढा येथे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच व्हावे अशी मागणी यावेळी लिंगायत संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांनी केली होती .याच बैठकीत लिंगायत समाजतील  हिंदू लिंगायत सह अन्य राहिलेल्या सर्व पोटजातींना ओबीसीचे आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकाऱ्याना दिले व या संदर्भात तातडीने अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा