टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतीय सेनेचे संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत व अन्य 12 अधिकाऱ्यांना प्राथ.माध्य आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज व ज्यु कॉलेज येड्राव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्याप्रसंगी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रतिमा पुजन करून त्यांच्या जीवन व कार्याची माहीती दिली. व अमरज्योत प्रज्वलित करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश पवार यांनी शब्द सुमनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रा. विश्वंभर काळे,प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश माळी, माजी सैनिक औदुंबर माने, गंगाधर काळे, भारत शिंदे भारत पाटील, शांताराम पाटील भीमराव येलमार,
मच्छिंद्र कोळेकर, रघुनाथ मंगेडकर असे पंधरा आजी- माजी सैनिक हजर होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग
या सर्वांनी देशाचे पहिले सर्वात लोकप्रिय जनरलला व अन्य 13 जण अधिकाऱ्यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्राथ.माध्य.व ज्यु सर्व शिक्षक रोंगे ,सर घुले सर,पडनुरे सर, डोके सर यांनी मनोगत मांडले
प्रास्तावीक गोरक्ष जाधव, सुत्र संचलन पाटील टी पी माळी एम एस व आभार सचिन कांबळे यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा - 9970766262

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा